आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:महिलेची 20 ग्रॅमची सोनपोतचोरट्याने धूमस्टाइल लांबवली; चाळीसगावात हनुमानवाडी भागातील घटना कॅमेऱ्यात चित्रित

चाळीसगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुला समवेत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्याने हिसकावनू नेली. महिलेने मदतीसाठी आरडओरड केली. मात्र रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांपैकी कोणीही मदतीसाठी आले नाही. त्यामुळे चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोत हिसकावतांना महिलेच्या गळ्याला किरकोळ जखम झाली. १८ रोजी सकाळी सकाळी ११.१५ वाजता हनुमानवाडीत ही घटना घडली. हनुमानवाडीतील रहिवासी सुषमा प्रमोद पाटील (वय ३५) या सकाळी आपल्या आठ वर्षीय मुलासह शाळेची पुस्तके घेण्यासाठी गेल्या होत्या. पुस्तके न मिळाल्याने त्या घराकडे पायी येत होत्या.

वाटेत ३५ ते ४० वयाचा चोरटा काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवर आला. त्याने डाेक्यावर मिलट्री रंगाची कॅप व डोळ्यात काळा चष्मा घातला होता. अंगात राखाडी रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. चोरट्याने सुषमा पाटील यांच्या गळयातील सोन्याची पोत बळजबरीने तोडली. तो शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने पळून गेला. त्यावेळी सुषमा पाटील यांनी आरडाओरड करत त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. परंतू रस्त्याने जाणाऱ्यांपैकी कुणीही मदत केली नाही. त्यामुळे चोरट्याने २० ग्रॅम वजनाची ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. चाळीसगाव शहर पोलिसांत कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...