आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सर्वत्र संविधानाची चौकट मोडण्याचे सुरू आहे काम; सुषमा अंधारे यांची चोपड्यात टीका

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांचे अधिकार त्यांना दिलेच पाहिजे. मात्र, ते देशात होताना दिसत नाही. गृहमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्यावर कारवाई करत नाहीत. मात्र, एका आदिवासी तरुण शरद कोळी या बांधवाविरुद्ध खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम आज झाले आहे. शरद कोळी यांच्यावर जिल्हा-बंदी घातली आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम १४चा नियम गेला कुठे? तर सध्या सर्वत्र संविधानाची चाैकट माेडण्याचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाेपड्यातील महा-प्रबोधन यात्रेनिमित्त आयाेजित सभेत केले. या वेळी त्यांनी शिंदे गटातील स्थानिक आमदारांवर चकार शब्द ही काढला नाही.

या वेळी मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, संपर्कप्रमुख विलास पारकर, सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला जिल्हा संघटक रोहिणी पाटील, उपजिल्हा प्रमुख गोपाळ चौधरी, संजय ब्राम्हणे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, यावलचे रवींद्र सोनवणे, माजी तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे, उपसंघटक दीपक जोहरी, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक कण्हय्ये, चंदू महाजन, गोपाळ सोनवणे, शशिकांत देवरे, डॉ. रोहन पाटील, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. आजच्या सभेत जे अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या कार्यक्रमांपासून लांब होते असे दीपकसिंग जोहरी, माजी तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे हे सक्रिय झाल्याचे दिसून आले. सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. सभेला राष्ट्रवादीचे माजी आमदार कैलास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदिरा पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्यासह चंद्रहास गुजराथी, आशिष गुजराथी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, चेतन बाविस्कर आदी उपस्थित होते.

पक्षाने सहा वेळा तिकिट देवूनही गद्दारी : पक्षाने ६ वेळा तिकिट दिले, ३ आमदार केले, तरी देखील म्हातारपणात गद्दारीचा डाग लावून घेतला. नाव कमवायला आयुष्य खर्ची करावे लागते. मात्र, गद्दारांमध्ये तुम्ही सर्वात पहिले जावून बसला. उतारवयात तुम्ही गद्दारीचा डाग लागू द्यायला नकाे हाेता, असा टाेला एरंडाेल येथील जाहीर सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार चिमणराव पाटील यांना लगावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सभेत त्या बोलत होत्या. संपर्कप्रमुख संजय सावंत अध्यक्षस्थानी होते. सभेत युवा सेनेचे राज्य समन्वयक शरद कोळी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील पाटील यांच्यावर टीका केली. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी खासदार संजय राऊत यांची लवकरच जामिनावर सुटका होणार असून त्यांचा जामीन झाल्यानंतर याच ठिकाणी खासदार राऊत यांची जाहीर सभा घेऊ, असे सांगितले.

सभेपूर्वी पक्षाचे चिन्ह असलेली मशाल मान्यवरांच्या हस्ते पेटवण्यात आली. जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी जिल्ह्यात शिवसेना संघटीत असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे सांगितले. सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, हरीश पांडे, संदीप बोढरे, काँग्रेसचे डॉ. फरहाज बोहरी, गजानन पाटील, माजी जि.प.सदस्य नाना महाजन यांनीही भाषण केले. शहरप्रमुख कुणाल महाजन यांनी सूत्रसंचालन केले. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतरही सभास्थळी धनुष्यबाण चिन्हांच्या पताका व ध्वज लावलेले होते.

विशेष पथकाने घेतला शरद काेळींचा शाेध ...
युवा सेना विस्तारक शरद काेळी यांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे विशेष पथक घेवून रात्री ८ ते १० वाजेपर्यंत चाेपड्यात ठाण मांडून हाेते. मात्र, शरद काेळी चाेपड्यात सभेला न आल्याने त्यांचा शाेध सुरु हाेता.

बातम्या आणखी आहेत...