आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतीने पूर्ण:रस्ते, पुलांची कामे गतीने पूर्ण करावी

धरणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरखेडा येथील पुलाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. या वेळी रस्ते व पुलांची कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना दिले.

तालुक्यातील मुसळी फाटा, बोरखेडा, वाघळूद, अनोरा रस्ता हा पूर्वी जिल्हा परिषदेकडे ग्रामीण मार्ग दर्जाचा होता. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७ मार्च २०१९ला या रस्त्याची दर्जोन्नती केल्याने हा रस्ता आता प्रजिमा १०० झाला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, २ कोटी निधीतून सुरु असलेल्या बोरखेडा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. मंजूर असलेले पूल व रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. बोरखेडा पुलामुळे मुसळी, बोरखेडा, वाघळूद व अनोरा या गावांना दिलासा मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी आज पुलाची पाहणी करुन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, असेही ते म्हणाले. या वेळी ग्रामस्थ हजर होते.

बातम्या आणखी आहेत...