आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी कट्ट्या:चाेपड्यात तरुणास गावठी कट्ट्यासह घेतले ताब्यात

चोपडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील चोपडा ते यावल रोडवरील कारगिल चौकातील भाऊ हॉटेल समोर शहरातील रंगराव आबा नगरमधील अजित गुजर बारेला (वय ३७) या तरुणाला एक गावठी बनावट पिस्तूल व मॅक्झिनसह पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना २ रोजी दुपारी उघडकीस आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजित गुजर बारेला हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत शहरातील भाऊ हॉटेल समोर अजित बारेला याला अटक केली.

त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा पिस्तूल व एक मॅगझिन तसेच एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या वेळी अजित बारेला याच्याकडून पोलिसांनी ३० हजार किमतीचा एक गावठी कट्टा, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी अजित बारेला यास चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.़

बातम्या आणखी आहेत...