आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:चोपड्यात दोन घरांमध्ये चोरी,‎ दोन लाखांचा मुद्देमाल लंपास‎

चोपडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बोरोले नगर -२ मध्ये दोन घरे‎ फोडून, चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल‎ लंपास केला.‎ कन्या विद्यालयातील शिक्षक निवृत्ती‎ पाटील व फैजपूर येथे वनविभागात नोकरीला‎ असलेले रोहिदास पाटील यांच्या बंद घरात, ५‎ ते ६ फेब्रुवारीच्या पहाटे ही चोरी झाली.‎ कडीकोंडा तोडून चोरटे घरात शिरले.‎ चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व अन्य वस्तू‎ चोरून नेल्या.

निवृत्ती पाटील यांच्या घरातून १‎ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल,‎ त्यात एकूण ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, टीव्ही,‎ दोन पितळी पातले, एक सायकल आणि २०‎ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लांबवला.‎ तसेच रोहिदास पाटील यांच्या घरातील पाच‎ हजार रुपये किमतीचे दोन पितळी पातले, एक‎ पितळी समई असा दोघा घरातून २ लाख १‎ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल अज्ञात‎ चोरट्यांनी लंपास केला आहे. निवृत्ती प्रल्हाद‎ पाटील यांच्या घरातील सामानाची नासधूसही‎ चोरट्यांनी केली आहे.

तर वनविभागातील‎ कर्मचारी मुरलीधर पाटील १५ दिवसांपूर्वी‎ परिवारासह फैजपूर येथे नोकरीला असल्याने‎ घर बंद करून गेले होते. त्यांच्या बंद घरात ही‎ चोरीची घटना घडली आहे. रविवार‎ असल्याने कन्या विद्यालयाचे शिक्षक निवृत्ती‎ पाटील हे देखील मूळ गावी सनपुले येथे गेले‎ होते. त्यांचेही बंद घर चोरांनी हेरले.‎ याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात‎ कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...