आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी जप्त:दुचाकींची चोरी; गॅरेज चालकास अटक‎

एरंडोल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लक्ष्मी नगरमधील‎ शिक्षकाची दुचाकी चोरीप्रकरणी‎ जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या‎ पथकाने धुळे येथील गॅरेज‎ चालकास अटक करून एरंडोल‎ पोलिसांच्या ताब्यात दिले.‎ त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी‎ जप्त करण्यात आल्या आहेत.‎ दरम्यान, न्यायाधीश विशाल धोंडगे‎ यांनी त्यास दोन दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली आहे. या चोरी‎ प्रकरणात धुळे येथील स्थानिक गुन्हे‎ शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा‎ सहभाग असल्याची प्राथमिक‎ माहिती मिळाली आहे.‎

येथील लक्ष्मी नगरमधील संजय‎ रमेश पाटील यांच्या मालकीची‎ दुचाकी (एमएच- १९, बीएक्स-‎ ६५९२) ११ जुलै २०२० रोजी रात्री‎ चाेरी झाली हाेती. याप्रकरणी संजय‎ पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार‎ दिली होती. संजय पाटील यांनी ही‎ दुचाकी जळगाव येथील अपना कार‎ बाजारातून खरेदी केली होती.‎ जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या‎ पथकास मिळालेल्या गुप्त‎ माहितीवरून पथकाने धुळे येथील‎ चाळीसगाव रस्त्यावरील समर्थ‎‎‎‎‎‎‎‎‎ कॉलनी परिसरातील गॅरेज चालक‎ जुबेद रशीद पठाण उर्फ बबलू पठाण‎ यास अटक करून एरंडोल‎ पोलिसांच्या ताब्यात दिले. बबलू‎ पठाण याच्या ताब्यातून जवळपास १‎ लाख २० हजारांच्या ३ दुचाकी जप्त‎ करण्यात आल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...