आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वकिलाच्या घरात चार लाखांची चोरी

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर बंद करून मुलाच्या शाळेत गेलेल्या वकिलाच्या घराचा मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून, पावणे चार लाखांचे दागिने आणि रोख रक्कम, असा ३ लाख ८५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. १ रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान धुळे रोडवरील भारत गॅस गोदामाच्या मागील भागात ही घटना घडली. अॅड. किशोर बागुल हे मुलांचा सहामाही परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पत्नीसोबत घराला कुलूप लावून ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये गेले होते.

११ वाजता ते घरी परत आले. तेव्हा त्यांना बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पाहणी केली असता मागील दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. घरातील कपाटातील २ लाख ३५ हजार रुपयांची ४७ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ८० हजार रुपयांची १६ ग्रॅम सोन्याची जुनी पोत, ६० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, १० हजार २०० रुपये रोख असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी अॅड. बागुल यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...