आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:आंबे वडगाव येथून पिकअप बोलेरोची चोरी; पोलिस ठाण्यात रितसर तक्रार

पाचोरा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आंबे वडगाव येथून पिकअप बोलेरो गाडीची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सावखेडा येथील संजय धोंडूसिंग परदेशी यांच्या मालकीची एमएच ४८ जी ०५८० या क्रमांकाची पिकअप बोलेरो गाडी आहे. ते ही गाडी भडगाव तालुक्यातील जुवार्डी, वाडे या गावांहून आंबे वडगाव येथील जोगे फाट्यावर असलेल्या डेअरीमध्ये दूध वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर चालवतात. या गाडीवर चालक म्हणून आंबे वडगाव येथील देवानंद रघुनाथ कोळी हा चालक कामावर असून . १३ रोजी रात्री अंदाजे ११ वाजेच्या सुमारास असेच दूध वाहतुकीचे काम संपल्यानंतर त्याने नियमितपणे तानाजी पाटील यांच्या घराजवळ गाडी लावून घरी झोपण्यासाठी गेला. नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी तो पुन्हा दूध घेण्यासाठी गाडी उभी केलेल्या ठिकाणी आला. मात्र तेथे त्यास गाडी न दिसल्याने त्याने लोकांना विचारणा केली. मात्र काहीच माहिती न मिळाल्याने गाडी मालक संजय परदेशी यांना भ्रमणध्वनीवर कळवला. मालक परदेशी यांनी मंगळवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...