आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:चाळीसगावातील चोऱ्यांचा उलगडा, दागिने केले जप्त

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या महिनाभरात झालेल्या घरफोडी तसेच चोरीच्या घटनांचा उलगडा करून चोरट्यांना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बीड येथील दोघा सराईत चोरट्यांना शिताफीने पकडले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले चार लाखांचे सोन्याचे दागिने व एक लाखांची रोकड असा पाच लाखांचा ऐवजही हस्तगत केला.

चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चोऱ्यांचे काही गुन्हे गुन्हा दाखल झाला होते. या गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात दोन अंदाजे २० ते २२ वयोगटाचे व्यक्ती पोलिसांना दिसून आले हाेते. पोलिसांनी सापळा रचून दोघांना चाळीसगावातच अटक केली. संशयित अकबर लुकमान खान (वय २३) व आर्यान पप्पू शेख (वय १८) दोघेही दौला वडगाव (ता. आष्टी, जि. बीड) अशी संशयितांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...