आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाचे दर्शन:ऋषिपंचमीनिमित्त हजाराे महिलांनी घेतले कपिलेश्वर महादेवाचे दर्शन

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर दोन वर्षांनी ऋषिपंचमी निमित्त खान्देशातील हजाराे महिलांनी तापी व पांझरा नदीच्या संगमावर वसलेल्या कपिलेश्वर येथील त्रिपींडी महादेवाचे दर्शन घेतले.

कपिलेश्वर येथे त्रिवेणी संगमावर दिवसभरात जवळपास ६ हजार महिलांनी ऋषि पंचमीनिमित्त डुबकी लावून कपिलेश्वर त्रिपिंडीचे पूजन करून दर्शन घेतले. ३१ रोजी हरितालिका, १ सप्टेंबरला गणेश चतुर्थी तर २ रोजी ऋषिपंचमी निमित्त संगम स्थळी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील हजाराे महिला भाविकांनी दर्शन घेतले. ऋषि पंचमीनिमित्त कपिलेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने आयोजित केलेल्या महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला.

मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांनी दुपारी १ ते २.३० वाजेदरम्यान प्रवचन केले. त्यानंतर महिलांनी पूजा केली. सकाळी स्नान केल्यावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करून सायंकाळी नैवेद्य दाखवून महिलांनी ते नदीत विसर्जन केले. मंदिरावर पूजेच्या साहित्याची दुकाने होती. सपाेनि जयेश खलाने, हवालदार फिरोज बागवान, पोलिस नाईक सुनील तेली, महिला पोलिस व महिला होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. तर नंदादीप माध्यमिक विद्यालयातील स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...