आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बापासह तिघे ताब्यात

पाचोरा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे २० रोजी लोटन जयराम कुंभार (वय ३३) हे सकाळी ११ वाजता आपली चारचाकी घेऊन घरी जात हाेते. या वेळी रस्त्यावर गर्दी असल्याने त्यांनी त्यांचा साथीदार किरण कुंभार यास काय झाले, असे विचारले. या वेळी समोर उभ्या असलेला विश्वनाथ जगन्नाथ लोहार यास राग आल्याने त्याने त्याच्या हातीतील कुऱ्हाडीचा लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, लाेटन कुंभार यांनी हा वार उजव्या हातावर झेलला. याच वेळी मुलगा पंकज लोहार याने लाकडी काठीने लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तर लहान मुलगा भावेश याने लोटन कुंभार यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लाेटन कुंभार यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात संशयितांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.