आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेची हेळसांड:अमळनेर शहरातील तीन कॉलन्या अंधारात

अमळनेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निव्वळ दोन हजार रुपये खर्चासाठी गेल्या चार दिवसांपासून तीन कॉलन्या अंधारात आहेत. तर पालिका आणि वीज मंडळ या संदर्भात एकमेकांकडे बोट दाखवून जनतेची हेळसांड करत आहेत.

विजेच्या खांब्यावरील बंच केबल तुटल्याने शहरातील एलआयसी कॉलनी, बोरसे कॉलनी, सरस्वती कॉलनीमधील पथदिवे चार दिवसांपासून बंद आहेत. यामुळे या सर्व कॉलन्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य दिसत आहे. तर यामुळे चोरांची भीती वाढली आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर ही समस्येचे निराकरण झालेले नाही. द्वारका नगरमधील दोन स्पॅम-मधील वीज वितरण कंपनीची केबल जळाली आहे. केबल टाकणे व मेंटेनन्सची जबाबदारी वीज वितरणकडे आहे, असे पत्र मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी वीज वितरणला दिले आहे. तर वीज वितरणचे शहर अभियंता विनोद देशमुख यांनी वरिष्ठांकडे पत्र पाठवून केबलची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

त्यासाठी तीन ते चार दिवस लागतील, असेही सांगण्यात आले. पालिका आणि वीज वितरणच्या खो-खो खेळात नागरिक अंधारात आहेत. या संदर्भात माजी नगरसेवक विवेक पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे तक्रार केली. आमदारांनी तत्काळ पथदिवे सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, यासाठी केवळ १०० मीटर वायर व फक्त २ हजाराचा खर्च येणार आहे. तर, पालिका वायर टाकून पथदिवे सुरु करू शकते, असे वीज मंडळाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...