आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:किसान महाविद्यालयातील तीन‎ युवती ठरल्या मिस किसानीय‎

पारोळा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील किसान महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य‎ साधून विद्यार्थी विकास विभागातर्फे युवती सभेचे‎ आयोजन करण्यात आलेले होते.‎ या सभेत ९८ युवतींनी सहभाग नोंदवून गाणी, कविता,‎ नृत्य व प्रश्न-मंजूषा यासारखे विविध कलाविष्कार सादर‎ करुन जल्लोष केला. यातून उत्कृष्ट सादरीकरण‎ करणाऱ्या तीन विद्यार्थिनींना मिस किसानीय म्हणून‎ गौरवण्यात आले. यात प्रथम क्रमांक किरण शिंदे, द्वितीय‎ क्रमांक वैशाली पाटील तर तृतीय क्रमांक दिशा चौधरी‎ यांनी पटकवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान उपप्राचार्य‎ डॉ.गुणवंत सोनवणे यांनी भूषवले.

प्रास्ताविक युवती‎ सभा प्रमुख प्रा.डॉ. अनिता मुडावदकर तर सूत्रसंचालन‎ स्वाती महाजन या विद्यार्थिनीने केले. संयोजक प्रा.डॉ.‎ किरण पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. दीपक‎ साळुंखे व युवती सभा प्रमुखांनी सहकार्य केले. संस्थेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्हि. पाटील‎ यांनी विद्यार्थी विकास विभाग व मिस किसानीय‎ ठरलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. सर्व विजेत्यांचे‎ सर्वत्र काैतुक केले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...