आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:भाेजे येथील शेतकऱ्याचा तीन लाखाचा कापूस चाेरट्यांनी केला लंपास

पिंपळगाव हरेश्वर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव हरेश्वर जवळील भोजे येथील शेतकरी देवरंग शहादू माळी यांचा अंदाजे २५ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरुन पाेबरा केला आहे. या चाेरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.भोजे येथील शेतकरी देवरंग माळी यांचे गावालगत वरखेडी रोडवर पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये जवळपास ५० क्विंटल कापूस भरलेला होता. त्यातून सुमारे २५ क्विंटल कापूस चाेरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जवळच्या शिंदाड, चिंचपुरे, राजुरी, वरखेडी, पिंपळगाव, सावखेडा येथील शेती नसलेले मात्र कापूस विकणाऱ्यांवर बारीक नजर ठेऊन त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल पांडुरंग गोडबंगाल तपास करत आहेत. दरम्यान, आधीच अतिवृष्टीमुळे संकटात शेतकरी सापडले असून त्यात अशा भुरट्या चोरांची धाडसाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाेलिसांनी चाेरट्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...