आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:पाण्यात बुडून मंगरूळ, लाेणी अन‌् तळाेंदे येथे तिघांचा मृत्यू

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील शेतमजुराचा तळाेंदे येथे आढळला मृतदेह

तालुक्यातील तळोंदे येथील आधार भगवान पवार हे शेतकरी २७ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शेतात कपाशी पिकावर औषध फवारणीसाठी गेले हाेते. औषध फवारणीसाठी पाणी घेण्यासाठी पवार हे शेताजवळील विहिरीकडे गेले असता विहिरीत एक व्यक्ती पाण्यात पालथा पडलेला त्यांना दिसला. पवार यांनी ही माहिती पोलिस पाटलांना दिली. पोलिस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी आल्यानंतर दोराच्या सहाय्याने या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.

या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील दोन पुरूष मजूर शेती कामासाठी आलेले आहेत. त्यापैकी मदन रामसिंग बारेला (वय ५५, रा. रोहिणी, पो. डुलकटबोरी, ता. जि. बऱ्हाणपूर) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. यात आधार पवार यांच्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तपास एएसआय मिलींद शिंदे करत आहेत.

पाय घसरून पडल्याने लोणी खुर्द येथे शेतकऱ्याचा मृत्यू

पारोळा | तालुक्यातील लोणी खुर्द येथे २६ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली. याबाबत समाधान सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पाराेळा पाेलिसांत अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. लाेणी खुर्द येथे समाधान शांताराम पाटील (वय २६) हे शेतकरी गावाजवळील विहिरीत पाणी काढण्यासाठी गेले हाेते. याचवेळी पाय घसरून ते विहिरीत पडले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी काही वेळानंतर त्यांना बाहेर काढून उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास विनोद साळी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...