आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदम मारहाण करून जखमी:अमळनेरात तिघांना  मारहाण

अमळनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीर्ण झालेल्या इमारतीचा भाग पाडण्यास विरोध करून सात जणांनी तिघांना बेदम मारहाण करून जखमी केले. ३० रोजी सकाळी ११.३० वाजता स्टेशन रोडवर ही घटना घडली. जखमींनी उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिल्याने, सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला. स्टेशन रोडवरील मेहुल भांडारकर यांची इमारत जीर्ण झाल्याने, पालिकेने इमारतीचा वरचा मजला पाडण्याची नोटीस दिली होती.

मुकादम शब्बीर नजीर पठाण, मजूर नासीर बशीर टकारे, रुस्तम पठाण, इकबाल सरदार हे ३० रोजी इमारत पाडण्यासाठी गेले. त्या ठिकाणी योगेश राजपूत, अशोक फालक, सुरेंद्र फालक, सुमित राजपूत, धवल राजपूत, जयेश राजपूत, गोपाल पाटील यांनी इमारतीचा जीर्ण भाग पाडण्यास विरोध केला. तसेच संबंधितांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित योगेश याने हातातील वीट टकारे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मेहुल भांडारकर यांनाही चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. काही जणांनी भांडण सोडवल्यानंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर टकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. बापू साळुंखे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...