आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कन्नड घाटात तीन ट्रक एकमेकांवर आदळले; वाहतूक ३० तासांनी सुरळीत

चाळीसगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-साेलापूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी एकाच दिवशी दाेन भीषण अपघात झाले. कन्नड घाटात पहाटे चार वाजता ब्रेक फेल झाल्याने तीन ट्रक एकमेकांवर आदळले. या अपघातामुळे कन्नड घाटातील वाहतूक ३० तासांनी सुरळीत सुरू झाली. दुसरा अपघात मेहुणबारेच्यापुढे तरवाडेबारीजवळ सकाळी ९ वाजता झाला. येथेही दाेन ट्रक समाेरासमाेर धडकले. एकाच दि​​​​​​​वशी दाेन अपघात झाल्याने महामार्ग पाेलिसांना चांगलीच धावाधाव करावी लागली. महामार्गावर चाळीसगाव कन्नड घाट परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने महामार्ग धाेकेदायक झाल्याची भावना वाहनधारकांमधून व्यक्त हाेत आहे.

मेहुणबारेजवळ अपघातात चालक गंभीर जखमी : दुसरा अपघात महामार्गावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास धुळे रोडवर मेहुणबारे गावाच्या पुढे तरवाडे बारी जवळ झाला. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यावर महामार्ग पाेलिस लागलीच घटनास्थळी रवाना झाले. चाळीसगावकडून धुळे मार्गे बडोदा येथे लोखंडी सामान घेऊन जात असलेला आयशर ट्रक (क्र.जी.जे. ६ एएक्स ०१७८) याची तसेच समोरून धुळ्याकडून बेंगलोरकडे जाणारा ट्राला (क्र.आर.जे.-०२ जीसी २०९७) या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबर हाेती की यात आयशर ट्रकच्या चालकाकडील बाजूचा संपूर्ण चक्काचूर झाला. यात आयशर ट्रकचा चालक शकील निहाल अहमद (वय ३१) रा. बडोदा हा गंभीररित्या जखमी झाला. महामार्ग पाेलिसांनी या जखमी चालकास १०८ रुग्णवाहिकेद्वारे तत्काळ चाळीसगाव ट्रॉमा केअर सेंटर येथे रवाना केले. अपघातामुळे झालेली वाहतुकीची मोठी कोंडी क्रेनच्या साह्याने रोडच्या बाजूला लावून वाहतूक सुरळीत केली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पाेलिसांची धावपळ
दाेन्ही अपघातांच्या महामार्ग केंद्राचे अधिकारी सहाय्यक पाेलिस निरिक्षक भागवत पाटील, सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील, एएसआय शामकांत सोनवणे, कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, शशिकांत पाटील, नितीन आगाेणे, किसन सोनार, संदीप सपकाळे, धनराज पाटील, प्रकाश चव्हाण, गणेश पवार, गणेश काळे, चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक नरेश सोनवणे, सोपान पाटील, शैलेश महाजन, नितिन ठाकूर, दिनेश चव्हाण, रमेश पाटील, जितेंद्र माळी यांनी परिश्रम घेतले.

ट्रक भर रस्त्यात अडकल्याने रांगा
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११वर असणालेल्या कन्नड घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता घाटातील महादेव मंदिराजवळ ब्रेक फेल झाल्याने तीन ट्रक एकमेकांवर आदळल्या. अपघातग्रस्त ट्रक भर रस्त्यात अडकल्याने घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दाेन क्रेन अपघातग्रस्त वाहनांपर्यंत पाेहचल्यानंतर दुपारी ते रस्त्यातून दूर करण्यात यश आले. त्यानंतर पाच वाजता घाटातून एकेरी वाहतूक सुरळीत झाली. दाेन्ही बाजूंकडून माेजकी वाहने साेडण्यात येत हाेती.

बातम्या आणखी आहेत...