आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाचोरा पोलिस ठाण्यामार्फत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने एक हजार सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक भूषण वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, नगरसेवक बशीर बागवान, माजी नगरसेवक नसीर बागवान, चंदू केसवाणी, पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव वले, प्रा.कमलाकर इंगळे, प्रा.माणिक पाटील, उपप्राचार्य जे.व्ही. पाटील, प्रा.योगेश पुरी, प्रा.सुधाकर कदम, हारुण देशमुख, माजी जि.प. सदस्य राजेंद्र साळुंखे, प्रवीण ब्राह्मणे, खंडू सोनवणे, विनोद अहिरे, अमजद खान, एस.के. पाटील, जुल्फिकार बागवान, अॅड.अविनाश सुतार, डॉ.अल्ताफ देशमुख, सुधाकर महाजन, दत्ता बोरसे, संजीता शेख, अश्पाक बागवान, पीतांबर जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, युवक, युवतीसंह विविध जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उद्घाटनपर भाषणातून पाचोरा मतदार संघातील विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी गेल्या आठवड्यात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता सलोखा ठेवल्याने नागरिकांचे आभार मानले. तर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ.वले, उपप्राचार्य जे.व्ही. पाटील, प्रा.माणिक पाटील, कमलाकर इंगळे, प्रा.गिरी यांनी पोलिस उपअधीक्षक काकडे, पोलिस निरीक्षक पाटील यांचा सत्कार केला. यावेळी वर्ड इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रेम शामणानी यांनी पेढे वाटून पोलिसांचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक विजया विसावे, योगेश गठाणे, कर्मचारी नितिन सूर्यवंशी, सुनील पाटील, भगवान बडगुजर, योगेश पाटील, दीपक सुरवाडे, बापू महाजन, तुषार विसपुते यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.