आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांपासून आमसभा झालेली नसून जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेतील आमसभा त्वरित घ्यावी, अशी मागणी अमळनेर भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आमदार अनिल पाटील यांना जाहीर पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून दिले आहे.
हे जाहीर पत्र सर्व जनतेचे समजून आमदार त्वरित यावर अंमलबजावणी करतील, अशी अपेक्षा ही देशमुख यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. आमसभे संदर्भात दिलेल्या जाहीर पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, शासन धोरणानुसार घेतली जाणारी आमसभा ही जनतेचे व्यासपीठ आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समाेर जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होणे, हेच आमसभेचे वैशिष्ट्य असते.
यामुळे विशेष करून ग्रामीण जनता आमसभेची आतुरतेने वाट पाहतात. परंतु, गत काही वर्षांपासून अमळनेर विधानसभेची आमसभाच झालेली नाही. त्यामुळे आमसभा घेण्याची तरतूदच रद्द झाली की काय? असा जनतेचा समज झाला आहे. गेल्या अडीच वर्षात विद्यमान आमदारांनी आमसभा घेतली नाही. ही सभा घेण्यास कोणतीही अडचण नसून तशी आता गरज निर्माण झालेली आहे.
अमळनेर तालुक्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, वीज कंपनी, सिटी सर्व्हे, कृषी, आरोग्य विभाग आदी ठिकाणी जनतेचे, शेतकऱ्यांचे तसेच दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ही आमसभा घेतल्यास निश्चितच हे प्रश्न सुटून जनतेला न्याय मिळेल. त्यामुळे ही आमसभा घेण्यासाठी आमदार विलंब करणार नाहीत, अशी अपेक्षा शीतल देशमुख यांनी व्यक्त करत तातडीने निर्णय घ्यावा, असे जाहीर पत्राद्वारे कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.