आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनादेश:मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबास; दिला 20 लाखांचा धनादेश

चाळीसगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील रहिवासी असलेल्या व अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे ग्रामसेवक असलेल्या ईश्वर पाटील यांचे, तीन महिन्यांपूर्वी शिंदखेडाजवळ अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला ग्रामसेवक संघटना पतसंस्थेने नुकताच, अपघाती विम्याचा २० लाखांचा धनादेश दिला.

ग्रामसेवक (स्व.) ईश्वर पाटील यांनी सैन्यदलात १७ वर्षे सेवा दिली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांची माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागेवर ग्रामसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. ग्रामसेवक पदावर असताना त्यांनी ८ वर्ष सेवा बजावली. तीन महिन्यांपुर्वी शिंदखेडाजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार अाहे. ग्रामसेवक पतसंस्थेकडून त्यांच्या कुटुंबाला २० लाखांची मदत मिळाल्याने, मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी मोठी मदत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...