आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसात फिर्याद:पैशांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल‎

पाडळसरे‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या निम‎ येथील माहेर असलेल्या‎ विवाहितेचा, आडगाव‎ (ता.यावल) येथे सासरच्या‎ मंडळींनी माहेरून पाच लाख रुपये‎ आणले नाहीत म्हणून छळ केला.‎ याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध‎ मारवड पोलिसात फिर्याद देण्यात‎ आली आहे. विविध सहा‎ कलमान्वये सहा जणांवर गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ फिर्यादी विवाहिता तेजस्विनी‎ धर्मराज बाविस्कर यांचे लग्न‎ आडगाव येथील धर्मराज रामदास‎ बाविस्कर यांच्यासोबत झाले,‎ त्यांना दोन अपत्ये आहेत.‎ लग्नानंतर सासरच्या मंडळींनी गोड‎ बोलून दागिने काढून घेतले. तसेच‎ सोन्याचे ब्रेसलेट व पाच लाख‎ रुपये हुंडा द्यायला हवा होता म्हणून‎ छळ सुरू केला. त्यानतंर विविध‎ कारणांवरून विवाहितेला माहेरी‎ सोडून जाऊ लागले. एप्रिल‎ महिन्यात मुलीसह विवाहितेला‎ माहेरी पाठवून देण्यात आले.‎

त्यानंतर १८ डिसेंबरला विवाहितेने‎ कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार‎ दाखल केली. त्यामुळे सासरच्या‎ मंडळींनी नीम येथे येवून तक्रार का‎ केली अशी विचारणा करत,‎ विवाहितेच्या वडिलांना मारहाण व‎ शिवीगाळ केली. तसेच पाच लाख‎ रुपये दिले तरच विवाहितेला‎ नांदण्यासाठी घेऊन जावू असे‎ सांगून निघून गेले. त्यामुळे‎ विवाहितेने मारवड पोलिसात पती‎ धर्मराज रामदास बाविस्कर,‎ विजया रामदास बाविस्कर,‎ रामदास आनंदा बाविस्कर, लक्ष्मी‎ रामदास बाविस्कर‎ (रा.आडगाव), ललिता प्रमोद‎ ठाकरे (रा.सुरत), योगिता सुनील‎ पवार यांच्याविरुद्ध तक्रार केली.‎

बातम्या आणखी आहेत...