आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पळसखेडा येथून लंपास‎ केली ट्रॅक्टरची बॅटरी‎

पारोळा‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक‎ येथील शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरमधून,‎ साडेपाच हजार रुपये किमतीची‎ बॅटरी चोरून नेल्याची घटना ६ रोजी‎ रात्री घडली. पळासखेडा बुद्रूक‎ येथील राजेंद्र मुरलीधर मराठे यांनी‎ आपले ट्रॅक्टर नेहमीप्रमाणे अंगणात‎ लावले होते. रात्री अज्ञात चोरट्याने‎ ट्रॅक्टरमधील सुमारे साडेपाच हजार‎ रुपयांची बॅटरी काढून नेली.

याबाबत‎ याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात‎ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पोलिस‎ चोरट्याचा शोध घेत आहेत.‎ पारोळा तालुक्यात शेतशिवारातून गुरे‎ व साहित्य चोरीच्या घटना वाढल्या‎ आहेत. तालुक्यात चोरांची एखादी‎ टोळी कार्यरत असावी, असा संशय‎ शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात‎ आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा‎ त्वरित बंदोबस्त करावा, अशी‎ मागणी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...