आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक शिक्षण आवश्यक:अपघात टाळण्यासाठी वाहतूक शिक्षण गरजेचे

चाळीसगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अति वेगात गाडी चालवल्यामुळे, रहदारीचे नियम न पाळल्यामुळे तसेच अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविल्यामुळे घडलेल्या अपघातांमध्ये देशात ३ लाख ९५ हजार लोकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शिक्षण खूपच आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी केले.

‘अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व उपाययोजना’ या विषयावर चाळीसगाव आगारात नुकतेच प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सपाेनि तुषार देवरे तर प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस उपस्थित होते. कार्यक्रमाला युवा उद्योजक नयन पाटील, शीघ्र कवी रमेश पोतदार उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई यांनी केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते विना-अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चाळीसगाव शहरातील १८ वर्षीय तरुण दर्शन खैरनार याने कल्पकतेने एसटीच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्यामुळे त्याचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...