आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेच मार्गदर्शन:राणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये अग्निवीर‎ भरतीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न‎

पारोळा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राणी लक्ष्मीबाई‎ महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास‎ विभाग व कवयित्री बहिणाबाई‎ चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा‎ विद्यार्थी विकास विभाग यांच्या‎ संयुक्त विद्यमाने, अग्नीवीर सैन्यदल‎ भरती प्रशिक्षण कार्यशाळेचे‎ आयोजन झाले. कार्यशाळेचे‎ उद्घाटन मार्गदर्शक व प्रशिक्षक तथ‎ निवृत्त सैनिक संदिप पाटील‎ यांच्याहस्ते झाले.‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य‎ डॉ.डी.आर.पाटील होते. उपप्राचार्य‎ डॉ.एस.बी.भावसार,‎ प्रा.जे.बी.पाटील, डॉ.एस.बी.सावंत,‎ प्रा.एस.सी.पाटील,‎ डॉ.डी.एच.राठोड उपस्थित होते.‎ प्रास्ताविक डॉ.एस.एन.साळुंखे‎ यांनी केले. संदिप पाटील यांनी‎ मनोगतात अग्नीवीर प्रशिक्षणासाठी‎ मनापासून तयारी करायला हवी.‎

रोज वेळेत धावणे, नियमित व्यायाम‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व सराव, देशसेवेची प्रबळ इच्छा‎ असेल तर यश हमखास मिळते.‎ म्हणून स्वकर्तृत्वावर तुम्ही अग्नीवीर‎ बनू शकता, असे त्यांनी सांगितले.‎ उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार यांनी‎ सांगितले की, महाविद्यालयात‎ सुसज्ज पटांगण व ट्रॅक आहे. त्याचा‎ वापर करून लांब उडी, गोळा फेक‎ सराव होतो. त्यात नियमित सहभागी‎ व्हावे, असे त्यांनी सांगितले.‎ अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य‎ डॉ.डी.आर.पाटील यांनी संधीचे‎ सोने करून स्वतःच्या मेहनतीने‎ देशसेवेची इच्छा पूर्ण करा असे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांगितले.

सूत्रसंचालन‎ डॉ.एस.व्ही.चव्हाण यांनी केले.‎ देशसेवेत योगदान देण्यासाठी‎ सध्या अनेक तरूण अग्नीवीर‎ भरतीसाठी सराव करत आहेत. या‎ विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,‎ शारीरिक सराव आणि‎ चाचणीबाबत नियोजन करण्याच्या‎ टीप्स प्रशिक्षणातून मिळाल्या.‎ त्यामुळे आगामी काळात पारोळा‎ तालुक्यातून मोठ्या संख्येने‎ अग्नीवीर देशाच्या सेवेत दाखल‎ होतील, असा विश्वास व्यक्त‎ झाला.‎

बातम्या आणखी आहेत...