आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या महिन्यात ग्रामीण पोलिसांनी ९ लाखांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघा तरुणांना पकडले होते. ती घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी दुचाकीद्वारे गांजाची वाहतूक करणाऱ्या तरुणास जेरबंद केले. पोलिसांनी जवळपास ३ किलो गांजा व दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण, हवालदार दत्तात्रय महाजन, पोलिस नाईक जयंत सपकाळे, गोवर्धन बोरसे, भूपेश वंजारी, पोलिस कॉन्स्टेबल हिराजी देशमुख, मनोहर पाटील यांचे पथक ९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास भडगाव रस्त्यावर वाघळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बोरखेडा गावाच्या बस स्टॉपजवळ चाळीसगावकडून भडगावकडे जाणारी दुचाकी (एमएच- १९, डीएस- २१७६) दिसली.
या दुचाकीस्वाराचा पोलिसांना संशय आला. त्याची पोलिसांनी झडती घेतली असता चाळीसगाव येथील जुन्या पावर हाऊस जवळ राहणाऱ्या तेजस महादेव खरटमल (वय १९) याच्याकडे २ किलो ९०० ग्रॅम वजनाचा ४३ हजार ५०० रुपयां गांजा मिळाला. पोलिसांनी हा गांजा व दुचाकी असा सुमारे १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तेजस खरटमल यास अटक केली. या प्रकरणी पोलिस नाईक जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन तेजस खरटमल व केदार मोहिते विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.