आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती सोहळा:दुचाकी रॅली, वृक्षारोपणासह विविध स्पर्धांतून  क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना वंदन; शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांतर्फे महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन

एरंडोलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून दुचाकी रॅली तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

आमदार चिमणराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ केला. कार्यक्रमास तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, देविदास महाजन, रवींद्र महाजन, प्रा. मनोज पाटील, विजय महाजन, शालिग्राम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, प्रा. शिवाजीराव अहिरराव, रमेश महाजन, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, पी. जी. चौधरी, दुर्गादास महाजन, योगेश महाजन, संजय महाजन, प्रमोद महाजन, रूपेश माळी, राजेंद्र महाजन, अमोल जाधव, अशोक चौधरी, प्रा. जितेंद्र महाजन, कुणाल महाजन, अतुल महाजन, शोभा महाजन, वर्षा शिंदे, आरती महाजन यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी प्रा. गौतम निकम यांच्या ‘लोककल्याणकारी बळीराजा’ या पुस्तकाचे सर्वांना वाटप करण्यात आले. डॉ. सुरेश झाल्टे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारीत सत्यशोधक समाज या विषयावर व्याख्यान सादर केले.