आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा:प्रताप विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या हाती तिरंगा

चोपडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हातात तिरंगा व संस्थेच्या सर्व ज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वतः रंगवलेला राष्ट्रध्वज होता.

भारत मातेच्या वेशभूषेत एक विद्यार्थिनी सहभागी झाली. राष्ट्रध्वज लावलेली झोपडी ते लाल किल्ल्यापर्यंत सर्वधर्मसमभाव दर्शवणारे फलक लेखन कमलेश गायकवाड यांनी केले. होतकरू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी सुहास पवार यांच्याकडून मान्यवरांच्या हस्ते गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तिरंगा हमारी शान हे गीत यावेळी पी.बी.कोळी व पंकज नागपुरे यांनी सादर केले. मुख्य प्रवेशद्वारापासून अमृत महोत्सवाच्या वेगवेगळ्या छटा दर्शवणाऱ्या रांगोळ्या विविध रंगाने तसेच वस्तूंचा वापर करून तयार करण्यात आलेले तिरंगा ध्वज प्रदर्शित केलेले दिसत होते.

शाळेचे बँड पथक, एनसीसी कॅडेट, स्काऊट, आरएसपी व गाईड यांनी आकर्षकता वाढवली. कार्यक्रमासाठी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरी मयूर, चंद्रहास गुजराथी, प्रवीण गुजराथी, किरण गुजराथी, शैलेश अग्रवाल, मुख्याध्यापक पी.एस.गुजराथी, उपमुख्याध्यापक एस.जी.डोंगरे. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे.एस.शेलार, पर्यवेक्षिका एम.डब्ल्यू.पाटील, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, पी.डी.पाटील, योगी मयूर, संस्था समन्वयक गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, डी.टी.महाजन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...