आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शनासाठी गर्दी:त्रिविक्रम महाराज यांचा शेंदुर्णी परिसरात जयघाेष

शेंदुर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत तुकडाेजी महाराज, त्रिविक्रम महाराज यांच्या जयघाेषात सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी येथून अाज वारी शेंदुर्णीत पाेहाेचली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली हाेती.

संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे आठवे गादी-वारस आणि वहिवाटदार शांताराम महाराज भगत यांच्या समवेत आज चोपदार विजय सोनार, चोपदार कमलाकर सुतार, शिवाजी महाराज भगत, प्रल्हाद गवळी, कैलास चौधरी, वामन सकट, नारायण कुमावत, प्रल्हाद भगत, कन्हैया महाराज, संतोष महाराज, रामेश्वर महाराज, अर्जुन महाराज, लक्ष्मण महाराज, संजय भोई, महिला मंडळ, ग्रामस्थ, तेली समाजबांधव यांनी भगवंताचे नामस्मरण करुन वारीत सहभाग नोंदवला. दरम्यान, सोयगाव येथील राम मंदिरात कीर्तन झाले. गरुड महाविद्यालयातील प्रा.डॉ. योगीता तुषार भगत यांच्या कीर्तनाला सोयगाव व शेंदुर्णी येथील तेली समाजबांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता आरती होऊन या वारीची समाप्ती झाली.

बातम्या आणखी आहेत...