आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रक-दुचाकीचा अपघात; वाघऱ्याच्या प्रौढाचा मृत्यू

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तुराटखेडा गावाजवळ महामार्गावरील पुलावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून घरी जाणाऱ्या वाघरे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाराेळापोलिसांत गुन्हा नादवण्यात आला आहे.

वाघरे येथील आबा चत्रू हाटकर (वय ४०) हे त्यांच्या समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी दुचाकीने एरंडाेल तालुक्यातील पिंपळकोठा येथे गेलेहोते. अंत्यविधी आटोपल्यानंतर आबा हाटकर हे दुचाकीने परत येतहोते. तुराटखेडा गावाजवळीला पुलावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली.

दरम्यान, आबा हाटकर यांना तत्काळ रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी पारोळा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. धनंजय पाटील यांनी तपासून हाटकर यांचा मृत घोषीत केले. या प्रकरणी पारोळापोलिस ठाण्यात गुन्हा नादवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी वाघरे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केलीहोती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...