आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएरांडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने झाडास धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चालकासह क्लिनर जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे गावाजवळ झाला. ट्रकचा भाग झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्यामुळे क्रेनच्या मदतीने चालकाचा मृतदेह काढण्यात आला.
म्हसावदकडून एरंडोलकडे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लोखंडी सळई भरलेला ट्रक (एमपी- ११, एच- ०८५२) भरधाव वेगाने येत होता. उमरदे गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने विरुद्ध दिशेच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडास जबर धडक दिली. झाडास धडक दिल्यानंतर ट्रकचा पुढील भाग चेपला जाऊन ट्रक उलटला.
या अपघातात मध्य प्रदेशातील धार येथील ट्रकचालक प्रकाश गंगाराम बास्कले (वय ३०) आणि क्लिनर शाहरुख खान सोहिल खान (वय १८) हे दोघेही ठार झाले. याचवेळी उमरदे येथील पोलिस पाटील शेखर साहेबराव जगताप व संदीप सुखदेव पाटील हे शेतात जात होते. त्यांच्यासमोरच ट्रकचा अपघात झाल्यामुळे त्यांनी अपघातस्थळी धावत जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच ट्रकवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ट्रकमालाकास अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर माेठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरु केले.
ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि झाडात अडकलेल्या चालक प्रकाश बास्कले यांना बाहेर काढण्यात अाले. तर गंभीर जखमी असलेल्या शाहरुख खान सोहिल खान याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यास उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस पाटील शेखर जगताप यांच्या माहितीवरून ट्रकचालक प्रकाश बास्कले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात हवालदार काशीनाथ पाटील करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.