आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रेक फेल झाल्याने लाकडे भरलेला ट्रक कन्नड घाटात १०० फूट खोल दरीत कोसळला. त्यात चालक ठार झाला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लीनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. मात्र तो जखमी झाला. कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महामार्ग पोलिसांनी सकाळी चालकाचा मृतदेह शोधला.आंध्र प्रदेशातून चाळीसगावकडे लाकडांनी भरलेला ट्रक येत होता. घाट उतरत असताना ब्रेक फेल झाल्याने चालक रामू सत्यम याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. प्रसंगावधान राखत क्लीनरने उडी मारल्याने तो बचावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.