आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत विजयी:संचालकांवरील असलेला  विश्वास हेच सूतगिरणीतील विजयाचे कारण

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील घुमावल बुद्रुक येथे सूतगिरणी निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सैन्यदलात भरती झालेल्या युवकांना निरोप, असा दुहेरी कार्यक्रम पार पडला.

अध्यक्षस्थानी विधान सभेचे माजी सभापती अरुण गुजराथी होते. या वेळी माजी आमदार कैलास गोरख पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन घन:श्याम पाटील यांची उपस्थिती हाेती. सरपंच वसंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूतगिरणीचे नवनियुक्त २० संचालकांची कार्यक्रमाला उपस्थिती हाेती. या सर्वांच्या नागरी सत्काराचे आयोजन लोकनियुक्त सरपंच वसंतराव पाटील यांनी केले होते.

तसेच सैन्य दलात भरती झालेला तरुण राज भरत पाटील व सूरज भरत पाटील यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित संचालकांना देखील या वेळी भावलाल पाटील, शिवराम पाटील, तुकाराम पाटील, दत्तात्रय पाटील, कैलास पाटील, विश्वास पाटील, मोतीलाल पाटील यांनी गौरवले. सूत्रसंचालन वसंतराव पाटील यांनी केले. या वेळी माजी आमदार दिलीपराव सोनवणे व कैलास पाटील तसेच रमेश जे. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांना न्याय देता येईल, असे नियाेजन हवे ...
संचालकांवरील विश्वास हेच सूतगिरणीतील विजयाचे कारण असून सूतगिरणी संचालकांना मोठ्या विश्वासाने मतदारांनी निवडून दिले आहे. तालुक्यात साखर कारखाना, सूतगिरणी हे दोन मोठे प्रकल्प आहेत. शेतकऱ्यांना न्याय देता येईल, अशा पद्धतीचे नियोजन झाले पाहिजे. हा प्रकल्प चालवून रोजगार निर्मिती केली पाहिजे, असे अरुण गुजराथी या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...