आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फसवणूक:विद्यार्थ्याकडून वडिलांच्या खात्याचीमाहिती घेऊन अडीच लाख लांबवले; कॅशबॅकच्या बहाण्याने रक्कम लाटली

धरणगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला १७०० रुपयांचा कॅशबॅक आला आहे. तुमची बँक खात्याची माहिती पाठवा, असे बोलून भामट्याने १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विश्वास संपादन केला. विद्यार्थ्यानेही स्वत:चे आणि वडीलांच्या बँक खात्याची माहिती भामट्याला दिली. त्यामुळे भामट्याने २ लाख ४३ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. धक्कादायक बाब म्हणजे भामट्याने एकदा फसवणूक केल्यानंतरही फोन करून विद्यार्थ्याकडे वडीलांचा बँक खात्याचा तपशील मागून पुन्हा रक्कम काढून घेतली.

येथील लिटील ब्लॉसम स्कूलच्या संचालिका ज्योती दीपक जाधव (वय ४३, रा. प्लॉट नं. ३९, गिताई निवास, चिंतामण मोरया नगर, धरणगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांचा मुलगा सर्वेश जाधव याचे बँकेत खाते आहे. तसेच त्याचे फोन पे खातेदेखील आहे. सर्वेशच्या वडीलांच्या खात्यातून रक्कम काढल्याचे मॅसेज प्राप्त झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. त्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

भामट्याने अशी केली फसवणूक
१० रोजी सर्वेशच्या मोबाईलवर ८९६७७८८०२४ या क्रमांकावरून फोन आला. भामट्याने कॅशबॅकचे कारण सांगून सर्वेशच्या खात्यातून चार हजार रुपये काढले. त्यामुळे सर्वेशने भामट्याला फोन केला. त्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगून, घरात दुसरे कोणाचे खाते असेल तर त्याचे डिटेल्स पाठवा, असे सांगितले. त्यामुळे सर्वेशने वडीलांचा मोबाईल नंबर दिला. त्यामुळे त्यांच्या खात्यातून २ लाख ३९ हजार काढून घेतले.