आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मुंदखेडे येथील बंद घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. १५ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंदखेडे येथील शेतकरी रामदास बना पाटील यांनी कापूस विक्रीनंतर ३ लाख ९ हजार ७०० रुपये इतकी रक्कम आली. ती रक्कम व आणखी ४० हजारांची रोकड तसेच ३८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा सगळा ऐवज घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत लोखंडी कपाटात ठेवलेला होता. पाटील हे कुटुंबासह १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून नातेवा इकाकडे उत्तरकार्य विधीसाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी ते घरी परतले असता चाेरी झाल्याचे उघडकीस आले.
चोरट्यांनी कपाटातून ३ लाख ४९ हजाराची रोकड व ३८ हजार रुपये किमतीचे दागिने असा ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपीचा काहीएक माग नसताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर शनाखाली पीएसआय लोकेश पवार, एएसआय राजेंद्र साळुंखे, हवालदार नितीन सोनवणे आदींच्या पथकाने गोपनीय सूत्र वापरले. मुंदखेडेत गतवर्षी चोरीचा प्रकार घडला होता. त्यातील कानातील दागिने एका लग्नात महिलेच्या कानात दिसला. हे दागिने कुठे घेतले याची विचारपूस केली असता ते चोरीचे असल्याचे उघड झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.