आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:इगतपुरी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चाळीसगाव शहरातून दोघांना अटक ; महिलेचाही सहभाग उघड

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी येथील रेल्वे तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना, २२ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयित चाळीसगाव येथे लपल्याची माहिती, त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शहरातील बामोशी बाबा दर्गा भागातील एका झोपडीतून एका महिलेसह दोघांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. इगतपुरी येथील ३६ वर्षीय तरूण आपला ८ वर्षाचा मुलगा व १५ वर्षाच्या भाच्यासह आंघोळीसाठी रेल्वे तलावावर गेला होता. त्याच परिसरात दोन तरुणी व दोन ते तीन तरुण मद्यपान करत होते. यातील दोन संशयितांनी तरुणाच्या मानेवर चाकूने वार केला होता. या घटनेनंतर संशयित पसार झाले होते. रक्तस्रावामुळे जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इगतपुरी पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. हे संशयित धुळे येथे असल्याचे मोबाईल लोकेशनवरून कळाले. इगतपुरी पोलिसांनी धुळे गाठले. मात्र तेथे आरोपींचे मोबाईल लोकेशन हे चाळीसगाव येथे पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात असल्याचे दिसले. त्यामुळे धुळे आझादनगर पोलिसांच्या मदतीने इगतपुरी पोलिसांनी चाळीसगाव शहर पोलिसांना संशयितांचे मोबाइल लोकेशन पाठवले. त्यानुसार पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, कॉन्स्टेबल नीलेश पाटील, अमोल पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, महेंद्र पाटील यांच्या पथकाने ३१ मे रोजी रात्री ८ वाजता, पीर मुसा कादरी दर्गाशेजारी असलेल्या झोपडीतून संशयित जुबेर मुन्वर पिंजारी (वय २५) व त्याची पत्नी बसंती जुबेर पिंजारी (वय २४, दोन्ही रा. धुळे) यांना ताब्यात घेतले. दोघांना इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पती-पत्नी रेल्वेत गाणी म्हणून करतात उदरनिर्वाह खुनाच्या गुह्यात अटक केलेले पती-पत्नी रेल्वे गाड्यांमध्ये गाणी म्हणून उदरनिर्वाह करीत असल्याचे तपासात समोर आले. खुनाच्या घटनेनंतर दोघे बामोशी बाबा दर्गा भागात झोपडीत राहत होते. मात्र मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी त्यांचा माग काढला.

बातम्या आणखी आहेत...