आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सत्रासेनजवळ गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात

चोपडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावठी पिस्तुलासह पोलिसांनी सत्रासेन गावाजवळ बुधवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. सत्रासेन फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर कारमध्ये (एम.एच ४६-१४३०) विना परवाना शस्त्र घेऊन दोघे संशयित जात होते. संशयित छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ (वय ४०, रा.भोरटेक, ता.शिरपूर) यांना पोलिसांनी पकडले. तसेच २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व ३ लाखांची कार जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...