आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा:पोत चोरीतील तिघांना‎ दोन दिवसांची कोठडी‎

पहूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वृद्ध महिलेची सोन्याची पोत‎ लांबवणाऱ्या चारपैकी दोन महिलांना‎ पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते. तर‎ त्यांना ओमनीत घेऊन येणाऱ्या‎ चालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा‎ दाखल केला होता. या तिघांना आज‎ जामनेर न्यायालयाने त्यांना दोन‎ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.‎ पहूर येथील सिद्धिविनायक‎ गणपती मंदिरात शुक्रवारी काल्याचे‎ किर्तन आटाेपल्यावर दर्शन‎ घेण्यासाठी रांगेतील गंगाबाई‎ पंढरीनाथ पाटील यांची ५ ताेळे‎ वजनाची सोन्याची एका महिलेने‎ चोरी केल्याची घटना घडली होती.‎ उपस्थित दोन महिलांना ग्रामस्थांनी‎ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले‎ हाेते.

तर दोन महिला फरार झाल्या‎ हाेत्या. या महिला चाळीसगाव येथून‎ मारुती व्हॅनमध्ये आल्या होत्या.‎ व्हॅनचा चालक पवन काशिनाथ‎ साळुंके (वय २६, रा. चाळीसगाव)‎ याची त्यांनी गाडी भाड्याने घेतली‎ हाेती. त्यामुळे पहूर पोलिसांनी‎ त्याला सोडण्याचा निर्णय घेतला‎ होता. परंतु, पोलिस निरीक्षक प्रताप‎ इंगळे यांनी त्याची चौकशी केली‎ असता पवन हा अट्टल चोरटा‎ असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून‎ त्याच्या विरुद्ध ही रात्री उशिरा गुन्हा‎ दाखल केला होता. त्यानंतर या‎ तिघांना जामनेर न्यायालयात हजर‎ केले असता त्यांना दोन दिवसांची‎ पोलिस कोठडी सुनावली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...