आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात २७ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत शहरासह तालुक्यात पावसाने सुरुवातीस रिमझिम पण नंतर दमदार हजेरी लावली. मागील १२ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी विहरींचा सहारा घेऊन पिके जगवण्याची धडपड सुरु केली होती. अखेर सोमवारी सायंकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता तूर्त मिटवली आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांनी बी बियाणे, खते घेऊन खरीप हंगामाची तयारी केली आहे. सोमवारी दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६ वाजता अचानक वातावरणात बदल झाला. ७ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री ९ वाजेनंतरही सुरू होता. मोंढाळे, विचखेडे, दळवेल, दगडी सबगव्हाण, म्हसवे, लोणी, वंजारी, बोदरडे, टोळी, भोंडण आदी ग्रामीण भागात किमान एक ते दीड तास पावसाने दमदार हजेरी लावली.
परिसरात सोमवारी सायंकाळी समाधानकारक पावसाने हजेली लावली. त्यामुळे कपाशीच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे नागरीक आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पाऊस जोरदार असल्याने वाहनधारकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
येथे सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर वातावरणमध्ये उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास ढग भरून आले व पावसाला सुरूवात झाली. पावसातच वाऱ्याचा वेगही जास्त होता. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता तूर्त मिटली.
परिसरात मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु, २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दमदार पाऊस झाला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. यापुर्वी १९ व २२ जूनला एक तास पावसाने हजेरी लावली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.