आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य अपात्र:अतिक्रमण प्रकरणी धामणगाव ग्रा.पं.चे दोन सदस्य अपात्र ; सार्वजनिक जागेवर अतिक्रमण

चाळीसगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी धामणगाव ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र ठरले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हा निकाल दिला आहे. धामणगाव येथील ग्रामपंचायत सदस्या पुष्पाबाई रामेश्वर निकम यांनी त्यांच्या मालकी हक्कापेक्षा जास्त सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले. याच घरात राहत त्या असल्याची तक्रार धामणगाव येथील बालाजी केशव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समोर सुनावणी झाली. बालाजी पवार यांनी ग्रामपंचायतीचे दुसरे सदस्य संदीप प्रभाकर निकम यांनी ही शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती. त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. या दोन्ही घटनांमध्ये संंबंधितांनी अतिक्रमण केल्याचे झालेल्या सुनावणीत सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधनिियम १९५९चे कलम १४ ज-३ नुसार पुष्पाबाई निकम आणि संदीप निकम यांना अपात्र घोषीत केले.

बातम्या आणखी आहेत...