आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचाहत्तरीपर्यंत मैत्री:आयुष्यभर मैत्री जपलेल्या फत्तेपुरातील दोघांनी घेतला जगाचा निरोप

सुहास चौधरी | जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फत्तेपूर येथील बालपणापासून पंचाहत्तरीपर्यंत मैत्री जपलेल्या जीवलग मित्रांनी आठवडाभरात दोघांनी जगाचा निरोप घेतला. पंधरा दिवसांपूर्वी दोघांचा पुणे येथील विजयाची खूण दाखवणारा व्हीडिआे स्मरणात राहिला आहे. त्यांच्या मृत्यूने फत्तेपूरकर हळहळले. सुभाषचंद्र रघुनाथ न्हावी (न्हावी सर) व प्रभाकर काशिराम चौधरी हे बालपणापासून मित्र. एकाच गल्लीत राहिले, सोबत शाळा शिकले. प्रभाकर चौधरी हे सातवीपर्यंतशिक्षण घेऊन किराणा दुकानावर कामाला लागले. तर सुभाष न्हावी यांनी पुढील शिक्षण घेऊन फत्तेपूर येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

दोघांचे संबंध अधिकाधिक दृढ होत गेले. थोडी आर्थिक परिस्थीती सुधारल्यानंतर दोघांनी एक भूखंड घेऊन लागूनच घरेबांधली. न्हावी सर यांच्या पत्नीचे सात वर्षांपूर्वी अकाली निधन झाले. तेव्हापासून दोघेही एकाच रूममध्ये वास्तव्य करु लागले. एकमेकांना सुखदुख:त साथ देत दोघोही आयुष्याच्या पंचाहत्तरीपर्यंत पोहचले. तब्बेत बरी नसल्याने महिनाभरापूर्वी न्हावी हे पुण्याला मुलीकडेगेले. चौधरी यांनी पंधरा दिवसांपूर्वी पुण्याला जाऊन मित्राची भेट घेत संभाषणाचा व्हिडीओ मुलाला रेकॉर्ड करावयास लावला. विजय चौधरी यांनी दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ केला. यावेळी दोघांनी व्हिक्ट्रीची खूण केली, त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी न्हावी सर यांचे निधन झाले. मित्र गेल्याचे दु:ख चौधरी यांच्या चेहऱ्यावर व बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते. अखेर चार सप्टेंबर रोजी चौधरी यांचेही निधन झाले.

मैत्री ची पंचक्रोशीत चर्चा
राजस्थानातून आलेले न्हावी हे इंग्रजांच्या काळात फौजदार होते. इंग्रजांनी स्वकीयांवर गोळ्या चालविण्याचे आदेश डावलून त्यांनी फत्तेपूर गावातच आपला व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुले होती. त्यापैकी सुभाष न्हावी हे एक आदर्श शिक्षक होते. त्यांच्या मैत्रीची चर्चा होती.

बातम्या आणखी आहेत...