आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:दोन दुकाने, हॉटेलात चोरी करणारा जेरबंद

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दोन किराणा दुकाने व हॉटेल फोडून चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. अकबर लुकमान खआन (वय २३, रा.दौला वडगाव, ता.आष्टी, जि.बीड) असे संशयिताचे नाव आहे.

शहरातील मुकेश चंदुलाल नंदवाणी यांच्या किराणा दुकानातून तीन हजार रुपये किमतीची दोन किलो खसखस, तसेच त्यांच्या शेजारील दुकानातून पाच हजार रुपयांची चिल्लर संशयिताने लांबवली होती. तसेच बस स्टँडसमोरील चौधरी यांच्या हॉटेलचे पत्रे वाकवून दोन हजार रुपये असा एकूण १० हजारांचा मुद्देमाल त्याने लंपास केला होता. या गुन्ह्यात त्याने एका अल्पवयीन बालकाचीही मदत घेतली होती. संशयिताने चोरलेली दोन किलो खसखस, तसेच चोरीसाठी वापरलेली पेंचीस आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. संशयितावर चाळीसगाव शहर, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सहायक फौजदार बापू पाटील, पोलिस नाईक संदीप पाटील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...