आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रा उचकावून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास:चाळीसगावात भडगावरोडवर दोन दुकाने फोडली

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या महिनाभरापासून चाेरी, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. बंद घरांपाठोपाठ रात्री दुकानेही फोडली जात आहेत. वर्दळीच्या भडगाव रेाडवरील दोन दुकानांच्या छताचा पत्रा उचकावून चोरट्यांनी, ९० हजारांची राेकड व इतर मुद्देमाल २१ रोजी रात्री लंपास केला. शहरात चाेरट्यांची टाेळी कार्यरत असल्याची भीती व्यक्त हाेत आहे.

शहरातील शास्त्रीनगरमधील रहिवासी आशिष जैन यांचे भडगाव रोडवर नवकार गिफ्ट शॉप हे दुकान आहे. जैन हे २१ रोजी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास व शेजारील स्वामी समर्थ ट्रेडर्सचे अतुल कोतकर हे रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. २२ रोजी सकाळी १० वाजता आशिष जैन हे दुकानात आले असता, त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच दुकानाच्या छताच्या पत्र्याचे नटबोल्ट काढलेले दिसले. दुकानातील ड्रावरमधून ७५ हजार रूपयंाची रोकड गायब होती. तर शेजारील स्वामी समर्थ ट्रेडर्सचेही पत्रे उचकावून १५ हजार रूपयांची रोकड चोरांनी लांबवली होती. पाेलिस निरिक्षक के.के. पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड तपास करत आहेत.

गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक
चाेरीच्या घटना आटाेक्यात आणण्यासाठी शहरात गस्त वाढवली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी ८ जणांचे विशेष पथकही तैनात केले आहे. नागरिकांनीही बाहेरगावी जाताना शेजारच्यांना कळवून जावे. घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. शक्य असल्यास सुरक्षा रक्षक नेमावा, पाेलिसांना सहकार्य केल्यास त्यांचेही काम साेपे हाेईल.
के. के. पाटील, पाेलिस निरीक्षक, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...