आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात ७९ % मतदानाची नोंद:वावडे येथे एकाच्या नावे दोघांचे मतदान

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी रविवारी ७९.६६ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तर सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम तहसीलमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले. वावडे येथे एकाच व्यक्तीच्या नावावर दोघांचे मतदान झाल्याचा प्रकार घडला.

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ७९.६६ मतदान झाले. तालुक्यातील १४ हजार ०७६ पुरुष मतदारांपैकी ११ हजार ४२२ जणांनी मतदान केले. तर १३ हजार ०७१ पैकी १० हजार २०४ महिलांनी मतदान केले. वावडे येथे एक प्रदत्त मतदान झाले. रात्री ९ वाजेला ईव्हीएम स्ट्रॉँग रूममध्ये जमा करण्यात आले. तहसीलदार मिलिंद वाघ, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, संतोष बावणे, एपीआय राकेशसिंग परदेशी, एपीआय जयेश खलाने यांनी बंदोबस्त ठेवला.

प्रदत्त मतदानाचे पुढे काय ?
मतमोजणीच्या वेळी एकाच मताच्या फरकाने विजय किंवा पराजय होत असल्यास, प्रदत्त मतदानही मोजणीत धरले जाते. अन्यथा एकापेक्षा अधिक मतांनी विजय-पराजयाचा निर्णय होत असल्यास हे मत गृहीत धरले जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...