आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी जेरबंद:धरणगावातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; धुळ्यातून सात दुचाकी जप्त ; संशयित आरोपींची ओळख पटली

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी धुळ्यातून ७ दुचाकी काढून दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. तेव्हापासून पोलिस चोरट्यांच्या मागावरच होते. दरम्यान, १९ मे रोजी मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलिस अधिकाऱ्याचीच दुचाकी लांबवली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. मग एक-एक करत चार संशयित आरोपींची ओळख पटली. खाक्या दाखवताच चोरट्यांनी गुन्हा कबूल करत धुळ्यातून ७ दुचाकी काढून दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ‘प्रसाद’ दिल्याबरोबर सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला. चोरट्यांकडून आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...