आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पाचोऱ्यात दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोन युवकांचा मृत्यू; एका जखमीवर खासगीत उपचार सुरू

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोंढाळे रोडवरील जलतरण तलावावरून परत येणाऱ्या युवकांची दुचाकी, दुभाजकावरून धडकून रविवारी दुपारी दीड वाजता जळगाव चौफुलीवर अपघात झाला. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील एक व पाचोरा शहरातील एक अशा दोन अल्पवयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य युवक किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उमर सत्तार बागवान (वय १७, रा. चिखली, जि. बुलडाणा), अयान खान आमीन खान (वय १५, रा. मुल्लावाडा, पाचोरा) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर साहिल सलीम शेख (वय १५, रा. अक्सानगर, पाचोरा) हा जखमी झाला आहे. हे तिघे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास होंडा शाईन दुचाकीने (क्र. एम.एच.२०-डी.झेड.२९४१) मोंढाळा रोडवरील जलतरण तलावावर पोहण्यासाठी गेले होते.

दुपारी परत येत असताना शहरातील जळगाव चौफुलीजवळील साईनाथ मार्बलसमोर त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात उमर सत्तार बागवान व अयान खान अमिन खान या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल सलिम शेख हा युवक जखमी झाला. मृतांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात दुचाकी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात ठार झालेले दोघे तरुण.

बातम्या आणखी आहेत...