आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील उखळवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उखळवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले कर्जदार प्रतिनिधी असे.- पंढरीनाथ गिरधर पाटील, अरुण पुंडलिक पाटील, सुकलाल धुडकु पाटील, मुरलीधर नामदेव पाटील, प्रभाकर संतोष पाटील, बापूराव रावण पाटील, भाईदास मन्साराम पाटील, मालुबाई सुरेश पाटील. महिला प्रतिनिधी- भिकुबाई नामदेव पाटील, सुशीलाबाई जगन्नाथ पाटील तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- कीर्तिकुमार पंढरीनाथ पाटील तसेच अनुसूचित जाती जमाती व बिगर मागास प्रवर्गात अर्ज न आल्याने सदर जागा रिक्त राहिली आहे.
सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व माजी संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.बी. पवार यांनी कामकाज पाहिले व गावाची बिनविरोध परंपरा कायम ठेवण्यात आली. यानंतर काही दिवसातच चेअरमन, व्हाइस चेअरमनची निवड होणार असल्याचे नवनिर्वाचित प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.