आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढाई:उंबरखेड, मेहूणबारे, दरेगावात सरपंच पदासाठी चुरशीची लढाई

उमेश बर्गे | चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात १६ पैकी २ ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध ठरल्या आहेत. तर निवडणुका होत असलेल्या १४ ग्रामपंचायतीत चांगलेच राजकारण तापले आहे. तालुक्यातील उंबरखेडमध्ये सरपंच पदासाठी तिरंगी व मेहुणबारे येथे बहुरंगी तर खासदारांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव येथे दुरंगी लढाई होत आहे. निवडणूक हाेणाऱ्या ग्राम पंचायतींपैकी आडगाव, चिंचखेडे, शिदवाडी, हिंगोणेसीम, संागवी, पिंपळवाड म्हाळसा व उपखेड या सात ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी सरळ लढती होत आहेत. तर करजगावला ६ उमेदवार रिंगणात आहेत. असून त्यात बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांच्या पत्नी तर मनोज साबळे यांच्या पत्नीही रिंगणात आहे. तर विसापूर, वलठाण या गावांमध्ये तिरंगी लढत होत आहे.

गणेशपूरला तब्बल ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर, दरेगाव, मेहुणबारे व उंबरखेड येथील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष आहे. उंबरखेड येथे सरपंच पदासाठी माजी सरपंच केदारसिंग पाटील व उमेश कर्पे यांच्यात चुरशीचा सामना आहे. येथे दोन पॅनल रिंगणात आहेत. दरेगाव येथेही माजी सरपंचांचे एक पॅनल व अन्य अशी दुरंगी लढत होत आहे. तर मेहुणबारे येथे माजी पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे बहुरंगी लढत आहे. मेहुणबारे येथे सरपंच पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...