आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:वरखेडे लोंढे धरणात पोहतांना काका-पुतण्याचा बुडून मृत्यू; नागर‍िकांनी काढले मृतदेह

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे संपूर्ण पर‍िसरात खळबड उडाली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बुद्रुक या गावात घडली आहे. हिरतसिंग जगतसिंग पवार व पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हे काका पुतणे या गावातील कायम रह‍िवाशी आहे. ते दोघेही आज सकाळी 8 वाजता तालुक्यातील वरखेडे लोंढे येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते.

दरम्यान, पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हा पाण्यात पोहत असतांना पाण्यातील जाळ्यात अडकला. पुतण्या पाण्यातून वर न आल्याचे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी देखील पाण्यात उडी घेतली. परंतु, हिरतसिंग पवार यांनादेखील आपल्या पुतण्याला वाचवता आले नाही आण पर‍िणामी यामध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर धाव घेवून दोघांचे मृतदेह काढण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...