आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ३८ गावांना २०१९ मध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. तीन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना ३५ कोटी ४० लाखांचे शासकीय अनुदान शासनाने अद्यापही न दिल्याने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकलहरे गावानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
आम आदमी पार्टीचे डॉ. रुपेश संचेती व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टी बाधित ३८ गावातील शेतकऱ्यांनी शिरपूर-अमळनेर रस्त्यावर एकलहरे गावानजीक आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर असाच संघर्ष पुढेही सुरु राहील. मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन मंत्र्यांना आंदोलनाद्वारे जाब विचारण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
यांचा होता आंदोलनात सहभाग
रास्तारोकोच्या वेळी सतीश बडगुजर, सात्री येथील राजेंद्र पाटील, गोवर्धन येथील मधुकर पाटील, शहापूर येथील राजू महाराज, भरवसचे सरपंच अशोक पाटील, डांगरी येथील गुलाबराव सिसोदे, मारवड येथील बाबा सुर्वे, एकलहरे येथील झुंबर पाटील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.