आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:नवीन औष्णिक विद्युत प्रकल्पांतर्गत; पाणी योजना रखडल्याने आज फुलगावात रेल रोको आंदोलन

वरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन औष्णिक विद्युत प्रकल्पांतर्गत पिण्याची पाण्याची योजना करून देणे बंधनकारक होते. तसेच त्याबाबत सुनावणीदेखील झाली होती; परंतु प्रकल्पाने सदरच्या योजनेची मंजुरी न दिल्याने अथवा त्याबाबत कार्यवाही न केल्याने, फुलगाव ग्रामस्थ शुक्रवारी कोळसा वाहतूक करणाऱ्या रेल्वेला रोखून आंदोलन करणार आहेत. फुलगाव गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला ३० वर्षे पूर्ण झाले आहेत.

ही जलवाहिनी जीर्ण झालेली आहे. तसेच प्रकल्पावर ३० लक्ष रुपये वीजबिल थकीत असून वीजबिल भरणा करण्यासाठी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. प्रकल्पांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली होती. यावेळी ६६० मेगावॅट प्रकल्पाला हरकती घेतल्यानंतर, फुलगावला पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून कार्यान्वित करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते.

याबाबत प्रस्ताव मुख्य अभियंतांनी मंजूरदेखील केला होता. या कामाची निविदा अद्यापही काढण्यात आली नाही. तसेच पाणीपुरवठा प्रकल्प करण्यास टाळाटाळ केली जात अाहे. त्यामुळे फुलगाव शिवारातून दीपनगर केंद्रात कोळसा वाहतूक करणारी रेल्वे रोखली जाणार आहे. रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...